02 March, 2023

 

पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर

अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : केंद्र शासनाच्या प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम 1960 मधील तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राणी क्लेश प्रतिबंधक (प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी स्थापना व नियमन) नियम 2007 च्या नियम 3 मधील तरतुदीनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या व्यवस्थापकीय समितीतील अशासकीय सदस्याची मुदत 31 ऑगस्ट, 2021 रोजी समाप्त झाल्याने नवीन अशासकीय सदस्याची नव्याने निवड करणे प्रस्तावित आहे.

            व्यवस्थापकीय समितीवर गोशाळा, पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष प्राणी विषयक कार्य करणारे सेवाभावी संस्थेचे सदस्य, मानवहित कार्य करणारे, प्राण्यावर प्रेम करणारे व्यक्तींची या समितीवर निवड होऊ शकते.

            पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी अर्जाचा नमुना सर्व पशुवैद्यकीय संस्थेत उपलब्ध करुन दिलेला आहे. इच्छूक व्यक्तींनी त्यांच्या संपूर्ण माहितीसह आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्ज  सादर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: