08 March, 2023

 

नशामुक्त भारत अभियानातर्फे व्यसनाची होळी

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 :  होळी , रंगपंचमी व विविध सणांच्या पार्श्वभूमीवर व्यसनांचे दुष्परिणाम निदर्शनास आणून देण्यासाठी दि. 6 मार्च, 2023 रोजी येथील जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोलीतील शहर पोलीस ठाणे परिसरात व्यसनी तरळ पदार्थ, व्यसनी गुटख्याच्या पुड्या, बिडी-सिगारेट अशा तंबाखूजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली . यावेळी व्यसनी पदार्थाची प्रतिकात्मक होळी पेटवून व्यसनमुक्ती प्रचार-प्रसार कार्यक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, नशाबंदी मंडळाचे विशाल अग्रवाल, समिती सदस्य शाम सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल यांनी केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपस्थितांना केले.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. समाज कल्याण निरीक्षक आर.एस.गडगिळे, ए.जी. राठोड, एल.टी.मुंडे, श्रीकृष्ण राव व आर. जी. पांचाळ आदींनी परिश्रम घेतले.

*****

No comments: