अनुसूचित जमातीच्या
शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी
वैयक्तीक व सामुहिक
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 09 : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत सन 2022-23 मधील मंजूर
आराखड्यानुसार अनुसूचित जमातीच्या शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना
वैयक्तीक, सामुहिक लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि.हिंगोली यांच्या नावे आवश्यक त्या कागदपत्रासह
दि. 14 मार्च ते 28 मार्च, 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टीचे
दिवस वगळून अर्ज सादर करावेत.
आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर रसवंती मशीन व इतर
अनुषंगिक साहित्यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी अर्जासोबत रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम
अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसील कार्यालय),
आधार कार्ड प्रत, दारिद्र्यरेषेखाली, अपंग, विधवा, परितक्ता असल्यास प्रमाणपत्र ,
आधार जोडणी केलेल्या बँकेच्या पासबूकची प्रत, कुटुंबातील कोविडमुळे मृत्यू
पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता, व्यवसायाचे ठिकाण, राशन
कार्ड आदी माहिती जोडणे आवश्यक आहे.
आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर शेती अवजारे
घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम
अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसील कार्यालय),
आधार कार्ड प्रत, दारिद्र्यरेषेखाली, अपंग, विधवा, परितक्ता असल्यास प्रमाणपत्र ,
आधार जोडणी केलेल्या बँकेच्या पासबूकची प्रत, कुटुंबातील कोविडमुळे मृत्यू
पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, सातबारा किंवा होल्डींग प्रत, राशन कार्ड
आदी माहिती जोडणे आवश्यक आहे.
आदिवासी लाभार्थ्यांना कृषिविषयक उद्योगाचे मार्गदर्शन व कार्यशाळा
आयोजन करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम अधिकारी यांनी
दिलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसील कार्यालय), आधार कार्ड
प्रत, दारिद्र्यरेषेखाली, अपंग, विधवा, परितक्ता असल्यास प्रमाणपत्र , आधार जोडणी
केलेल्या बँकेच्या पासबूकची प्रत, कुटुंबातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्या
व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता, राशन कार्ड आदी माहिती जोडणे
आवश्यक आहे.
आदिवासी लाभार्थ्यांच्या घरी 2.5 विद्युत जोडणी करणे आणि वीज मीटर
देणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम अधिकारी यांनी दिलेले
जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसील कार्यालय), आधार कार्ड प्रत,
दारिद्र्यरेषेखाली, अपंग, विधवा, परितक्ता असल्यास प्रमाणपत्र , कुटुंबातील
कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, आठ अ चा उतारा, राशन
कार्ड आदी माहिती जोडणे आवश्यक आहे.
वरील योजनांमध्ये अंशत:/पूर्णत: बदल करण्याचे तसेच वरीलपैकी
कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी
जि.हिंगोली यांनी राखून ठेवला आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या
लाभार्थ्यांनी वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावेत.
विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन
छंदक लोखंडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी
जि.हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment