24 March, 2023

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 24  :  राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवार, दि. 25 मार्च, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 25 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता सिल्लोड निवासस्थान येथून सिल्लोड-भोकरदन-जाफ्राबाद-देऊळगांव राजा-समृध्दी मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता भिरडा ता.जि.हिंगोली येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देतील. सकाळी 11.00 वाजता हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.00 वाजता सिल्लोड कडे प्रयाण .

 

*****

No comments: