समुदाय आधारित संस्थांनी युवा संवाद भारत कार्यक्रमांच्या आयोजनासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : नेहरु युवा केंद्र युवा कार्यक्रम व खेळ
मंत्रालय, भारत सरकार हिंगोली कार्यालयाद्वारा यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीकृत
कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन (समुदाय आधारीत संस्था) सिबीओ व्दारा युवा संवाद भारत @
2047 कार्यक्रमाचे आयोजन हिंगोली जिल्ह्यात करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
मा. पंतप्रधानांच्या प्रेरणेने आणि
मार्गदर्शनाखाली भारत आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याचे 75 वे
वर्ष आणि तिच्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या भाषणात पंचप्राण या मंत्राची
घोषणाही केली होती. अमृत कालच्या युगात भारताची दृष्टी @2047 यासंदर्भात युवा
व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि त्यांच्या नेहरु युवा केन्द्र संघटना 01 एप्रिल
पासून ते 31 मे, 2023 पर्यंत देशभरातील सर्व जिल्ह्यामध्ये समुदाय आधारित संस्था (सिबीओ)
मार्फत युवा संवाद भारत @ 2047 कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
जिल्ह्यातील विविध सिबीओ (समुदाय आधारित संस्था)
याच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने हा कार्यक्रम जिल्हास्तरावर आयोजित करण्याचे
नियोजन आहे. जे पंचप्राणांच्या अनुषंगाने देशाच्या भवितव्यावर सकारात्मक प्रवचन
निर्माण करण्यासाठी जिल्हा नेहरु युवा केन्द्रासोबत हात मिळवणी करतील. पंतप्रधानांच्या
कल्पनेनुसार हा कार्यक्रम टाऊ हॉल स्वरुपात आयोजित केला जाईल. ज्यामध्ये तज्ञ
मार्गदर्शक व्यक्ती पंचप्राण वर चर्चेचे नेतृत्व करतील. त्यानंतर प्रश्नोत्तर
सत्रात किमान 500 तरुण युवक सहभागी होतील. आयोजक सीबीओंना कार्यक्रमाच्या
आयोजनासाठी 20 हजार रुपयापर्यंत प्रतिपूर्ती केली जाईल. युवा संवाद कार्यक्रम आयोजित
करण्यासाठी पुरेशी संघटनात्मक ताकद असेल. संघटनांवर कोणतेही फौजदारी खटले प्रलंबित
नसतील. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रती जिल्हा 3 पर्यंत सिबीओ (समुदाय आधारित
संस्था) निवडले जातील.
निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छूक सिबीओ (समुदाय
आधारित संस्था) यांनी त्यांचे अर्ज जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, नाईक
नगर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, हिंगोली येथे सादर करावेत. नेहरु युवा केंद्र
कार्यालयामध्ये अर्जाचा विहित नमुना उपलब्ध आहे. अधिक तपशीलासाठी नेहरु युवा
केन्द्र, हिंगोली येथे व भ्रमणध्वनी क्र. 9149036302 वर संपर्क करावेत, असे आवाहन
जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment