21 March, 2023

महाज्योती अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या

एमएचटी, जेईई, नीट 2025 प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु


हिंगोली (जिमाका), दि. 21  :  महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एमएचटी, जेईई, नीट 2025 करिता पूर्व प्रशिक्षण योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत एमएचटी, जेईई, नीट परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते.  या प्रशिक्षणात संबंधित परीक्षेतील गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयाच्या तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना टॅबची सुविधा देण्यात येते. त्यासाठी लागणाऱ्या 6 जीबी प्रती दिवस इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. प्रशिक्षणासाठी  लागणाऱ्या दर्जेदार अभ्यास साहित्य घरपोच देण्यात येतो.

योजनेच्या लाभासाठी पात्रता : उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा .   उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना दहावीचे प्रवेश पत्र व नववीची गुणपत्रिका जोडावी. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :  नववी व दहावीची  गुणपत्रिका, ओळखपत्र,  विद्यार्थ्यांने 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा (बोनाफाईड प्रमाणपत्र), आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र यांच्या प्रती अपलोड करणे बाकी असल्यास अपलोड करणे बंधनकारक राहील.

अर्ज कसा करावा : महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for MHT-

CET JEE / NEET 2025 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.  अर्जासोबत 'ब' मध्ये नमूद कागदपत्रे स्वसाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन  https://mahajyoti.org.in/.../application-for-mht-cet-jee.../  या महाज्योतीच्या संकेतस्थळावर 31 मार्च, 2023 पर्यंत अपलोड करावेत, असे आवाहन प्रकल्प व्यवस्थापक, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती). महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी केले आहे.

*****

No comments: