महाविद्यालयातील सर्व प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित
शिष्यवृत्तीचे अर्ज
20 मार्च पर्यंत सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका),
दि. 13 :
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2022-23 प्रक्रिया ऑनलाईन
राबविली जात आहे. दि. 29 सप्टेंबर 2022 पासुन महाडिबीटी प्रणालीद्वारे सदरील
प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या आवेदनावर महाविदयालयांनी
पुढील कार्यवाही करुन ते समाज कल्याण विभागाकडे पाठविणे अपेक्षित आहे. परंतु
बहुतांश महाविद्यालयांनी बऱ्याचशा विदयार्थ्याच्या अर्जावर कार्यवाही केली
नसल्याची बाब समोर आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती
योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील अर्ज
महाविदयालय स्तरावर प्रलंबित असुन सातत्याने पत्रव्यवहार, बैठका, व्हॉटसअप
ग्रुपवरील संदेश याद्वारे सूचना देवूनही अर्ज मंजुरीबाबत कार्यवाही करत नसल्याची
गंभीर बाब पुढे आली आहे. प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज असलेल्या महाविद्यालयांना
पात्र सर्व अर्ज दि. 20 मार्च, 2023 पर्यंत पाठविण्याचे जाहीर आवाहन सहाय्यक
आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.
विहित मुदतीत पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,
हिंगोली या कार्यालयास सादर न केल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना
जबाबदार धरुन महाविद्यालयाची मान्यता रदद करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या
स्वाक्षरीने शासनस्तरावर पाठविण्यात येईल, याची सर्व महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी.
सर्व महाविद्यालयांनी दि. 20 मार्च, 2023 पर्यंत आपल्या महाविद्यालयातील
सर्व प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, हिंगोली यांच्याकडे मंजुरीसाठी महाडीबीटी (Maha-DBT) प्रणालीवर सादर
करण्यात यावे, आवाहन शिवानंद मिनगीरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment