सर्व यंत्रणांनी जिल्हा
वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा
- जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची
प्रक्रिया 20 मार्चपर्यंत पूर्ण करुन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचा निधी वेळेत
खर्च करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक
योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची
प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज
सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2022-2023 वर्षाचा
उपलब्ध निधी वेळेत खर्च करण्यासाठी सर्व
यंत्रणांनी त्यांना मंजूर केलेली तरतूद, उपलब्ध निधी याचे योग्य नियोजन करुन तांत्रिक
व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण करुन वेळेत खर्च करावा. त्याचा अहवाल
जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जलशक्ती अभियानांतर्गत सर्व शासकीय
इमारतीच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टींगची कामे करावीत. तसेच त्याचा डेटा अपलोड
करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, क्रीडा, आरोग्य,
महावितरण, शालेय शिक्षण, जलसंधारण, पाणीपुरवठा, नगरविकास, कृषी, बांधकाम, उद्योग,
रेशीम यासह विविध विभागाचा आढावा घेतला.
यावेळी विविध विभागाचे
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment