16 March, 2023

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

दोन हजार पेक्षा जास्त बेरोजगारांना नामांकित कंपन्यामध्ये रोजगाराची संधी

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 :  येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॅशनल कॅरिअर सर्व्हिस, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 मार्च, 2023  रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वसमत येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा.लि.पुणे, परम स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद, डीएसटीए एज्युकेशन फाउंडेशन पुणे, सुमित फॅसेलिटीज लिमिटेड पुणे, आर्मस इंडिया प्रा.लि. औरंगाबाद, साईश्रध्दा एंटरप्रायजेस पुणे, टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा.लि.पुणे, श्रीकृपा सर्व्हिस प्रा.लि.पुणे, एस.बी.आय. लाईफ इन्शूरन्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम परभणी, रक्षा सिक्यूरिटी फोर्स हिंगोली, महिंद्रा मनसा हिंगोली, महिंद्रा मनसा प्रा.लि. हिंगोली, जस्ट डायल लिमिटेड पुणे, आस्क एच.आर.सोल्यूशन्स औरंगाबाद, नवकिसान बायोप्लँट जळगाव, भारती एअरटेल लिमिटेड, क्वेस कॉर्प लिमिटेड औरंगाबाद, धूत ट्रान्समिशन्स प्रा.लि. औरंगाबाद अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपनी मेळाव्यामध्ये सहभाग घेणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार दोन हजार पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करावे. जेणेकरुन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.

जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), नवोदय विद्यालयासमोर, परभणी रोड, वसमत जि. हिंगोली येथे दि. 20 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत अधिक माहितीसाठी 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****

No comments: