महिला बचतगटाच्या
उत्पादित मालाचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे
जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या हस्ते 16 मार्च रोजी उद्घाटन
- नाविण्यपूर्ण
प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 15 : येथील महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या
उत्पादित मालाचे विक्री प्रदर्शन वाशिम रोडवरील रामलीला मैदानाजवळ असलेल्या महावीर
भवन येथे दि. 16 ते 18 मार्च, 2023 या कालावधीत सकाळी 10.00 ते रात्री 8.00
वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
हस्ते दि. 16 मार्च, 2023 रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे उपस्थित राहणार आहेत.
या नाविण्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विलास जगताप,
जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment