23 March, 2023

 

चार दिवसीय जिल्हा कृषी प्रदर्शनाला शनिवार पासून प्रारंभ

कृषी मोहत्सवात उभारले जाणार 200 स्टॉल ; कार्यक्रमाची रेलचेल

* जिल्हा कृषि महोत्सवाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 23  :  येथील रामलीला मैदानावर शनिवार, दि. 25 मार्च, 2023 पासून चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात होणार असून या प्रदर्शनात दोनशे स्टॉलची उभारणी केली जाणार असून या प्रदर्शनीचा जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांची उपस्थिती.

हा चार दिवशीय कृषी महोत्सव दि. 25 ते 28 मार्च या कालावधीत राहणार असून  दररोज कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या जिल्हास्तरीय कृषी मोहत्सवाचे उदघाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार हेमंत पाटील. आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राजू नवघरे, प्रज्ञा सातव, विपल्लव बजोरिया , जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, रविशंकर चलवदे , जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे , गोविंद बंटेवाड आदींची उपस्थिती राहणार आहे.

शनिवार, दि. 25 मार्च रोजी  शिवसांब लाडके,  प्रा. राजेश भालेराव, अजय कुमार सुगावे, पंकजलाल महाराज रोहिणी शिंदे यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन लाभणार आहे. तर रविवारी  कैलास गीते, अनिल ओळंबे, डॉ .ममता रुपालिया, मनोज  गायधने  स्वरसाद आर्केस्ट्रा , डॉ. हरिहर कौसडीकर ,प्रहलाद बोरगड यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर सोमवारी नितीन चव्हाण,  जैन इरिगेशनचे डॉ.जडे, गरुडा अेरोस्पेस चेन्नई, लोकशाहीर शामभाऊ वानखेडे यांचा लोक जागर कार्यक्रम होणार आहे. याशिवाय मंगळवारी एन सी डी ई एक्स, नागपूर, गोदाफार्म शेतकरी उत्पादक कंपनी कळमनुरी, प्रा. रोहिणी शिंदे, डॉ. साईनाथ खरात, श्रीमती सीताबाई मोहिते याचे विविध फळ पिकावर मार्गदर्शन लाभणार आहे.  या कृषी मोहत्सवात चर्चा सत्र, परिसंवाद या माध्यमातून सविस्तरपणे शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे.

या जिल्हा कृषि महोत्सवाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

 

No comments: