03 January, 2024

 

नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे करण्यास इच्छूक यंत्रधारकांनी

15 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  मृद व जलसंधारण विभागाच्या दि. 4 सप्टेंबर, 2017 च्या शासन परिपत्रकान्वये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नाला खोलीकरण, रुंदीकरणाच्या लोकसहभागातून होणाऱ्या कामांसाठी ग्रामपंचायत, खाजगी व्यक्ती, अशासकीय संस्था यांनी यंत्रसामुग्री उपलब्ध केल्यास त्यांना प्रती घन मीटरसाठी इंधनासह यंत्राचा येणारा सरासरी खर्च 30 रुपये एवढा कमाल दर निश्चित करण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार नाला खोलीकरण, रुंदीकरणची कामे करण्यास हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक जेसीबी, पोकलेन यंत्रधारकाकडून 15 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक यंत्रधारकांनी त्यांच्याकडील यंत्राच्या सविस्तर माहितीसह नोंदणी अर्ज जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, बियाणीनगर, महाराष्ट्र बँकेच्या जवळ, हिंगोली या कार्यालयाकडे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर नमूद असलेल्या कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, हिंगोली प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

No comments: