09 January, 2024

 आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे

यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे गुरुवार, दि. 11 जानेवारी, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 11 जानेवारी, 2024 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा-2024 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत/ महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांची आढावा बैठक घेणार आहेत.  सांय. 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सांय. 5.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण.

******

No comments: