08 January, 2024

 

थकबाकीदार लाभार्थ्यांनी एकरकमी योजनेचा

लाभ घेण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेत एकरकमी भरणा करणा-या लाभार्थ्यांस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (OTS) देण्याबाबतची सुधारीत एकरकमी योजना दिनांक 31 मार्च, 2024 पर्यंत लागू करण्यात येत आहे.

त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेवून कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, हिंगोली जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

*****

No comments: