जादुटोणा
विरोधी कायदा जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय समितीवर
महिला
अशासकीय व जिल्हा समन्वयक सदस्य नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जादूटोणा विरोधी कायदा
जनजागृती प्रसार व प्रचार अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये अशासकीय सदस्य व
जिल्हा समन्वयक पदी महिला सदस्याची नियुक्ती करावयाची आहे. यासाठी दि. 5
फेब्रुवारी, 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयास
प्रस्ताव सादर करावेत.
भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ठ, अघोरी, अमानुष संस्कारातून
रुजलेलया अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे नुकसान होत असल्याने व त्यांचे होणारे
शोषण व छळ थांबविण्यासाठी शासनाकडून दि. 20 डिसेंबर, 2013 रोजी महाराष्ट्र नरबळी
आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 जारी
करण्यात आलेला आहे.
जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम
अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीवर जादूटोणाविरोधी व अंधश्रध्दा निर्मूलनासाठी कार्य
करणाऱ्या व्यक्तींची (महिला सदस्य) अशासकीय व जिल्हा समन्वयक सदस्य म्हणून
नियुक्ती करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने जादुटोणा व अंधश्रध्दा निर्मूलन या क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छूक केवळ महिला सदस्यांनी प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, हिंगोली येथे दि. 5 फेब्रुवारी, 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment