पूर येथील जिल्हा परिषद शाळेत बाल कायद्यांची जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.आर. मगर
यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या
नियोजनानुसार तसेच चाईल्ड हेल्पलाईन कक्षाचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांच्या
मदतीने औंढा नागनाथ तालुक्यातील पूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जनजागृती
कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी चाईल्ड
हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे
संरक्षण कायदा प्रतिबंध, चांगला व वाईट स्पर्श याबाबत माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईनचे
केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी चाईल्ड
हेल्पलाईन 1098 बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे मदत
करते याविषयी माहिती दिली. समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी क्रांती ज्योती
सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेची माहिती दिली.
यावेळी शाळेचे
मुख्याध्यापक कल्याणकर, शिक्षक चाटसे, शेवाळकर, श्रीमती घुले व विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment