09 January, 2024

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार, दि. 10 जानेवारी, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार, दि. 10 जानेवारी, 2024 रोजी दुपारी 2.40 वाजता पोफळी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने आखाडा बाळापूर ता. कळमुनरीकडे प्रयाण. 2.55 वाजता आखाडा बाळापूर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने बाळापूरकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता बाळापूर येथे आयोजित शिवसंकल्प अभियान-कार्यकर्ता मेळावा (हिंगोली लोकसभा) कार्यक्रमास उपस्थिती. सांय. 4.30 वाजता मोटारीने आखाडा बाळापूर हेलिपॅडकडे  प्रयाण. 4.35 वाजता आखाडा बाळापूर हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे प्रयाण .

******

No comments: