अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांनी
निर्वाह भत्याची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा
करावी
हिंगोली (जिमाका), दि. 05 : केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 17 मार्च, 2022 व दि. 7 जुलै, 2023 च्या शासन
निर्णयात नमूद केल्यानुसार अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची
60 टक्के हिश्याची रक्कम महाडिबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न
बँक खात्यात जमा झाल्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह
भत्याची रक्कम वजा करुन उर्वरित शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, इतर ना परतावा
शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास सात दिवसाच्या आत जमा करण्याचे निर्देश
दिलेले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची सन 2021-22 व 2022-23
वर्षातील केंद्र शासनाची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक
खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात अशी
रक्कम जमा झालेली आहे अथवा काही दिवसात जमा होणार आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या
रकमेमधून आपली निर्वाह भत्याची रक्कम वजा करुन उर्वरित शिक्षण शुल्क, परिक्षा
शुल्क व इतर शुल्क रक्कम महाविद्यालयास जमा करावी. याप्रमाणे कार्यवाही न केल्यास
त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी,
असे असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयातर्फे करण्यात
आले आहे.
*******
No comments:
Post a Comment