09 January, 2024

 

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता यांनी

आपल्या अडचणी सादर करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : पुणे येथे दि. 9 जानेवारी, 2024 रोजी होणारा वेटरन्स मेला रद्द करुन पुढे ढकलण्यात आला आहे. रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालय यांच्याद्वारे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कँटीन याबाबतच्या असणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी माहे फेब्रुवारी, 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात पेन्शन अदालत/वेटरन मेळावा घेण्याचे नियोजन आहे.

ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता यांच्यावरील प्रकारच्या अडीअडचणी असतील तर त्या अडचणी तीन प्रतीमध्ये 15 जानेवारी, 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, हिंगोली येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: