मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 03 : एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी सन
2023-24 या सत्रात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाच्या सर्व मॅट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी सन 2023-24
मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठीचे उर्वरित प्रस्ताव करुन घेणे
आवश्यक आहे.
त्यानुसार सन 2023-24 साठी सावित्रीबाई फुले
शिष्यवृत्ती योजना इयत्ता पाचवी ते सातवी (अनु.जाती, विजाभज, विमाप्र, इमाव
स्वतंत्रपणे), सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता आठवी ते दहावी
(अनु.जाती, विजाभज, विमाप्र, इमाव स्वतंत्रपणे), अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या
पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा फी (अनु.जाती, विजाभज,
विमाप्र स्वतंत्रपणे), गुणवत्ता शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी ते दहावी (अनु.जाती,
अनु.जमाती व विजाभज/विमाप्र स्वतंत्रपणे), भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
अनु.जाती इयत्ता नववी व दहावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना विद्यावेतन, इयत्ता पहिली ते दहावीत शिकणाऱ्या इतर मागास
प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, इयत्ता पहिली ते
दहावीत शिकणाऱ्या विजाभज (डीएनटी) च्या विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकर मॅट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑफलाईन पध्दतीने उर्वरित ज्या
शाळांनी प्रस्ताव अद्यापपर्यंत दाखल केलेले नाहीत अशा सर्व शाळेतील
मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत दोन
प्रतीत सोबत सॉफ्ट कॉपी पेनड्राईव्हसह दि. 15 जानेवारी, 2024 पूर्वी जिल्हा समाज
कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयास सादर करावेत. जेणे करुन
मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत. मागासवर्गीय
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकावर
राहील, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment