जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार
दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 06 : येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज पत्रकार दिन
साजरा करण्यात आला. यावेळी प्रथमतः मराठी पत्रकार सृष्टीचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री
जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित
करुन मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. हा दिवस दरवर्षी
महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी पत्रकार एहसानखान पठाण, प्रकाश इंगोले, प्रद्युम्न
गिरीकर, शांताबाई मोरे, संदीप नागरे, संतोष भिसे यांनी पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन
करत सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार
दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी उपस्थित पत्रकार बांधवाचे आभार माहिती सहायक
चंद्रकांत कारभारी यांनी मानले.
यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाष अपुर्वा, एहसानखान पठाण,
शाम साळुंके, प्रद्युम्न गिरीकर, प्रकाश इंगोले, मनीष खरात, संदीप नागरे, गजानन पवार,
हाफीज बागवान, फारुख गोरेगावकर, संतोष भिसे, नंदकिशोर कांबळे, फकिरा नागरे पाटील, राठोड,
शशिकांत रामेश्वरे, महिला पत्रकार शांताबाई मोरे यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील
कैलास लांडगे, परमेश्वर सुडे आदींची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment