11 January, 2024

 

सायकल खरेदी अर्थसहाय्य लाभार्थी निवड प्रक्रीयेत

पालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2023-24 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामिण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करीता अर्थसहाय्य पुरवणे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे पंचायत समिती स्तरावरुन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन छाननींती अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती व  जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर व जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अंतिम पात्र झालेल्या यादीमधून जिल्ह्यातील 400 लाभार्थ्यांची व प्रतिक्षा यादीची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे दिनांक 16 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता षटकोणी सभागृह, जिल्हा परिषद हिंगोली येथे करावयाची आहे. तेव्हा यादीतील पात्र लाभर्यांच्या पालकांनी निवडीकरीता निवडीच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित रहावे. तसेच जे पालक उपस्थित राह्नार नाहीत त्यांचा त्या बाबतचा कोणताही आक्षेप विचारात घेतल्या जाणार नाही. याची पालकांनी नोंद घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

****

No comments: