04 January, 2024

 

जगदज्योती महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव

आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

·         जास्तीत जास्त गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची शासनाने स्थापना शासनाने केली आहे. या महामंडळाचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत कार्यान्वित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,रिसाला बाजार, हिंगोली 413513 दूरध्वनी क्र. 02456-224465 यांच्याशी संपर्क साधावा व या महामंडळाच्या योजनांचा फायदा जास्तीत जास्त गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या लोकांनी घ्यावा, असे आवाहन एस. एन. झुंजारे, जिल्हा व्यवस्थापक, हिंगोली यांनी केले आहे.

*******   

No comments: