भारतीय सशस्त्र
सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्वप्रशिक्षणाची सुवर्णसंधी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 25 जानेवारी रोजी मुलाखतीचे आयोजन
हिंगोली, (जिमाका) दि. 15 : भारतीय सशस्त्र सैन्यदल,
नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची
पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये
राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी 01 फेब्रुवारी, 2024 ते 15 एप्रिल,
2024 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची
निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक
उमेदवारांनी हिंगोली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 25 जानेवारी, 2024 रोजी मुलाखतीसाठी
उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी,
हिंगोली यांनी केले आहे. मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (डीएसडब्ल्यू)
यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील सीडीएस-62 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची
प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावेत. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सीडीएस
वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे
पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.
उमेदवार हा कोणत्याही
शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात
येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा.
अधिक माहितीसाठी प्रभारी
अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com अथवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9156073306 या व्हॉटसअप
क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment