डिसेंबर अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र
31 जानेवारी पर्यंत
सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 16 : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी
आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडे
आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीबाबतचे माहे डिसेंबर,2023 अखेरचे ईआर-1 त्रैमासिक
विवरणपत्र www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर
दि. 31 जानेवारी, 2024 पर्यंत ऑनलाईन भरावेत. माहे जानेवारी-2024 ची मासिक वेतन देयके
दाखल करताना ईआर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय
मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी
नोंद घ्यावी.
तसेच सर्व कार्यालयांना
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,हिंगोली या कार्यालयामार्फत
युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्व कार्यालयानी आपला ई-मेल पत्ता, दूरध्वनी
क्रमांक, पत्ता, टॅन क्रमांक, पॅन क्रमांक टाकून आपली प्रोफाईल अद्यावत करावी, असे
आवाहन सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment