20 January, 2024

 

विशेष मोहिमेमध्ये 223 प्रमाणपत्राचे वितरण

  • कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्रमाणपत्र काढून घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील पात्र व्यक्तींना दि. 17 व 18 जानेवारी, 2024 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील 223 लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठाची जिल्ह्यातील 158 गावामध्ये नोंदी आढळून आलेल्या आहेत. या 158 गावातील 1310  लाभार्थ्यांना कोरे अर्ज नमुन्याचे वाटप करण्यात आले होते. यापैकी 565 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी 223 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

हिंगोली तालुक्यातील 61 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. या 61 गावामध्ये 312 अर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 27 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी 08 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. कळमनुरी तालुक्यातील 23 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. या 23 गावामध्ये 75 अर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 72 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी 08 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. वसमत तालुक्यातील 13 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. या 13 गावामध्ये 205 अर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 65 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी 21 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. सेनगाव तालुक्यातील 43 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. या 43 गावामध्ये 410अर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 196 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी 11 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील 18 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. या 18 गावामध्ये 308 अर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 205 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी 175 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठाच्या आतापर्यंत 4 हजार 28 नोंदी आढळून आलेल्या आहेत. यापैकी 3 हजार 975 नोंदीचे स्कॅनींग झालेले असून या सर्व नोंदीचे स्कॅनींग जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. तसेच या सर्व नोंदीची संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत व तलाठी चावडीवर गाव प्रसिध्दी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील पात्र लाभार्थींनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करुन जात प्रमाणपत्र काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

******

No comments: