उपविभागीय अधिकाऱ्यांची शिरड शहापूरच्या प्रशिक्षणाला भेट
हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्हा परिषद प्रशाला शिरड शहापूर येथील प्रशिक्षणात उपविभागीय
अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणापासून ते उपजिल्हाधिकारी
होण्यापर्यंतचा प्रवासाचा सर्व उलगडा शिक्षक बांधवासमोर केला. यामध्ये एम.बी.बी.एस.
पूर्ण केल्यानंतर त्यांनी जिद्दीने अभ्यास करुन अनेक अडथळ्याची शर्यत पूर्ण करुन नियोजनबद्धरीत्या
अभ्यास करुन दररोजच्या दररोज अभ्यास पूर्ण करुन कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी
हे यश मिळवल्याचे सांगितले.
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणामध्ये
औंढा नागनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद व संस्थेच्या पहिली ती आठवीच्या सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने होत
आहे. यामध्ये 150 प्रशिक्षणार्थीची बॅच आहे. प्रशिक्षणाच्या या चौथ्या टप्प्यांमध्ये
औंढा नागनाथ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी वसमत
तालुक्याचे भूमिपुत्र तथा उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना
मार्गदर्शनासाठी बोलावले होते. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. खल्लाळ यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व शिक्षक बांधवांमध्ये एक वेगळ्या
प्रकारची ऊर्जा निर्माण झाली आहे व या ऊर्जेचा उपयोग खेड्यापाड्यातील वाडी तांड्यावरील
विद्यार्थ्यांसाठी नक्कीच होणार आहे. प्रत्येक ट्रेनिंगमध्ये असे व्यक्तिमत्त्वाचे
दर्शन गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले हे शिक्षकांना करुन त्यांच्यामध्ये ऊर्जा देण्याचे
कार्य सतत करत आहेत.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
सचिन गायकवाड यांनी केले तर गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले आभार प्रसंगी शैक्षणिक व
सामाजिक कार्य अथकपणे पुढे नेण्यात येईल, असे सांगितले.
******
No comments:
Post a Comment