11 January, 2024

 

चाईल्ड हेल्प लाईन युनिट (CHL) 1098 कडुन

कारवाडी परिसरात जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली अंतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, हिंगोली यांचे नियंत्रणाखाली कार्यरत असलेले चाईल्ड हेल्प लाईन युनिट कडुन जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यामध्ये कारवाडी परिसरातील पावित्रेश्वर माध्यमिक विद्यालय, मोजे पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वसई येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळा येथे बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. सदरील कार्यक्रमामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व बाल संरक्षण अधिकारी - श्री. जरीबखांन पठाण यांनी विद्याथ्यांना बालविवाह बाबत माहिती दिली. त्यामध्ये बालविवाहाची कारणे, त्याचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 या विषयी माहिती दिली, चाईल्ड हेल्प लाईन युनिट (CHL) चे केस वर्कर श्री. राजरत्न पाईकराव यांनी जिल्हास्तरावर बालकांसाठी कार्यरत आसणा-या यंत्रणाविषयी माहिती दिली

चाईल्ड हेल्प लाईन युनिट (CHL) च्या सुपरवायझर श्रीम. धम्मप्रीया पखाले व श्री. श्रीकांत बागमारे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना व त्या योजने संबंधीत आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती दिली. चाईल्ड हेल्प लाईन युनिट (CHL) चे सुपरवायझर - श्री. विकास लोणकर व केस वर्कर सुरज इंगळे यांनी चाईल्ड हेल्प लाईन टोल फ्रो.क्र. 1098 या बाबत माहिती दिली, श्री. तथागत इंगळे व समुपदेशक श्री. अंकुर पाटोडे यांनी बालकांचे हक्क व अधिकार या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व तसेच शाळेतील विद्यार्थी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

*****

 

No comments: