09 January, 2024

 

जल जीवन मिशन अंतर्गत लघुपट स्पर्धा

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिद्धीसाठी व ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेत 22 जानेवारी, 2024 पर्यंत सादर करावयाचे आहे.  जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल से नल देण्यासाठी पाणीपुरवठा योजनाची कामे सुरु आहेत. त्याच्या प्रबोधनासाठी जलशक्ती मंत्रालय भारत सरकार राज्याच्या पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय  दैने यांच्या मार्गदर्शनाखाली लघुपट स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी सादर करण्यात येणाऱ्या लघुपटाबाबत कॉपीराईटचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकास  बंधनकारक राहणार आहे.  लघुपट स्पर्धाच्या निर्मितीसाठी वापरलेल्या शूटिंग साहित्य व्यावसायिक दर्जाचे व उत्तम असावे. लघुपट निर्मितीसाठीच्या भाषेचा वापर हा प्रमाण मराठी असावे. कोणाचीही भावना, अस्मिता, दुखावनार  नाही याची स्पर्धकांनी काळजी घ्यावी. लघुपट स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला एकाच विषयावरील लघुपट सादर करता येणार येईल. लघुपट तीन ते पाच मिनिटाचा असावा. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक मिळणारा स्पर्धकांना अनुक्रमे 31 हजार, 21 हजार, 11 हजार रुपये बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन  सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदवून येत्या 22 जानेवारी पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, हिंगोली येथे लघुपटाच्या पेन ड्राईव्ह सादर करावेत.  लघुपट स्पर्धेसाठी विषय - पाण्याचे शाश्वत  स्त्रोत, पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती,     जलसंधारण, हर घर जल घोषित गाव विकास, जल जीवन मिशन यशोगाथा, विविध योजनांचे कृती संगम  हे विषय लघुपट निर्मितीसाठी घेता येणार आहेत.                                   

लघुपट निर्मिती स्पर्धेसाठी स्पर्धकांनी लघुपटाची निर्मिती स्वतः केलेली असावी. पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्व संगीत, गीत चित्रीकरण स्वतः तयार केलेले असावे. अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभागांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट स्पर्धेसाठी सादर करु नयेत. लघुपट निर्मितीसाठी दि. 22 जानेवारी पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष सादर करावेत, असे आव्हान ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रीती माकोडे  व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी केले आहे.  *****

No comments: