अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष
नरेंद्र पाटील यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली
(जिमाका), दि. 05 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र
पाटील हे दि. 9 व 10 जानेवारी, 2024 या दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत
आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 9
जानेवारी, 2024 रोजी सांय 4.30 वाजता परभणी येथून शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे
प्रयाण व हिंगोली येथे आगमन व मुक्काम.
बुधवार, दि. 10
जानेवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी
11.30 ते 2 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे महामंडळाच्या योजनांची
आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे
पत्रकार परिषद, दुपारी 3.00 वाजता भाजपा कार्यालय हिंगोली येथे भेट. सांय. 5.00
वाजता शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment