चाचा नेहरु बाल महोत्सव
उत्साहात संपन्न
हिंगोली (जिमाका), दि.29 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली
यांच्या वतीने दि. 27 जानेवारी ते दि. 29 जानेवारी, 2024 या कालावधीत चाचा नेहरु
बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील बालगृहात दाखल असलेल्या
बालकांच्या कलागुणांना वाव देणे हा बाल महोत्सव घेण्यामागचा उद्देश होता. या बाल
महोत्सवाचे उद्घाटन गृह विभागाचे पोलीस उप अधीक्षक सोनाजी आम्ले यांच्या हस्ते
करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मानसोपचार तज्ञ डॉ. निशांत माणका, आदर्श
महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माधव जाधव उपस्थित होते. यावेळी जिल्हा महिला व
बालविकास अधिकारी आर. आर. मगर, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, बाल कल्याण
समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे, जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे उपस्थित होते.
या आयोजित तीन दिवशीय बाल महोत्सवात लहान गट व मोठा
गट असे विभागून धावणे, कबड्डी, लांब उडी, गोळा फेक, पोत्याची रेस, दोरीवरील उड्या,
कॅरम, बुध्दीबळ, रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन
स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन यांच्यामार्फत बालविवाह पथनाट्य
सादर करण्यात आले. या कार्यक्रमात बालगृहातील बालके तसेच विद्यासागर विद्यालय
खानापूर चित्ता व आदर्श विद्यालय येथील मुलांनी उत्साहाने कार्यक्रमात भाग घेऊन
आपले कलागुण सादर केले. या स्पर्धामध्ये विजयी झालेल्या बालकांचे पारितोषिक वितरण अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या
हस्ते करण्यात आले.
यावेळी बाल रोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, महिला व बाल
विकास अधिकारी आर. आर. मगर, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, परिविक्षा अधिकारी
तथा सरस्तवती मुलींचे निरीक्षणगृह व बाल गृहाच्या अधीक्षक रेखा भुरके, बाल कल्याण
समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे, बाली
भोसले, संगीता दुबे, किरण करडेकर, बाल न्याय मंडळ सदस्य सत्वशीला तांगडे, उज्वल
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाईकराव उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment