फटाका दुर्घटनास्थळी पालकमंत्री झिरवाळ यांची पाहणी
▶️ मृतांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट; जखमींची रुग्णालयात विचारपूस
हिंगोली, दि. ७ : हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरातील फटाक्यांच्या साठ्याला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी दुर्घटनेतील परिस्थितीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
पालकमंत्री झिरवाळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच मृत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर पालकमंत्री झिरवाळ यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार राजू नवघरे, पदाधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment