08 October, 2026

एनएमएमएस परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ ; नियमित शुल्कासह १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

 एनएमएमएस परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ 

⏺️नियमित शुल्कासह १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

        हिंगोली, दि. ८ (जिमाका) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेसाठी ऑनलाइन शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ही परीक्षा २० डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

        महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ८ ते १४ ऑक्टोबर २०२६ अशी आहे. विलंब शुल्कासह अर्ज १५ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भरता येतील.

        अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळा व विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

         २१ ऑक्टोबर २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी स्पष्ट नोंद जाहिरातीत करण्यात आली आहे.

    अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे www.mscepune.in⁠ तसेच www.mscenmms.in⁠ हे संकेतस्थळ पाहावे.

                                                                                   ***

No comments: