09 October, 2026

पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता मतदानासाठी ३६ केंद्रे सज्ज

 पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता 



मतदानासाठी ३६ केंद्रे सज्ज

 पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता 

मतदानासाठी ३६ केंद्रे सज्ज

हिंगोली, दि. ९ (जिमाका) : ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चौंडेकर यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात २३ ऑक्टोबर रोजी मतदान

०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात या निवडणुकीसाठी एकूण ३६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण १० हजार ३१५ मतदार असून, त्यामध्ये ८ हजार ३३७ पुरुष आणि १ हजार ९७८ महिला मतदारांचा समावेश आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील बंदोबस्तासाठी ३६ पोलीस अंमलदार आणि एक गस्त वाहन नियुक्त करण्यात आले आहे.

२३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात १५ क्षेत्रीय अधिकारी, ४३ मतदान केंद्राध्यक्ष, १३० मतदान अधिकारी-कर्मचारी आणि ४२ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण आज पूर्ण झाले. दुसरे प्रशिक्षण १६ ऑक्टोबर, तर तिसरे प्रशिक्षण २२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

मतदान केंद्रांवर आरोग्य पथकांची व्यवस्था

मतदानाच्या दिवशी मतदार तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांच्या माध्यमातून मतदान केंद्रनिहाय आरोग्य पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे आवश्यकतेनुसार प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

No comments: