राज्य सामाईक
प्रवेश परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू
हिंगोली
(जिमाका), दि. 08 : शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्य सामाईक प्रवेश
परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र व कृषि तंत्रज्ञान या
व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी-2023 ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्र
राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात दि. 9 मे, 2023 ते 14 मे, 2023 या कालावधीमध्ये पीसीएम
ग्रुप सकाळी 7.30 ते दु. 12.00 पर्यंत व दुपार सत्राची वेळ दु. 12.30 ते सांय.
5.00 पर्यंत अशा दोन सत्रात सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वारंगा-हदगाव रोड,
कुर्तडी, ता. कळमनुरी जि.हिंगोली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षा केंद्र परिसरात दि. 9 मे, 2023 ते दि. 14 मे,
2023 या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.
तसेच परीक्षा केंद्रावर सकाळी 6.00 ते सांय. 6.00 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे
निर्बंध असतील.
परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये
परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही
व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन,
झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त
केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा
केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील
अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस
कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी
यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी
घेऊन जाण्यावर बंदी असेल.
या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून
त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी
प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील,
असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment