18 May, 2023

 

क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

  

हिंगोली (जिमाका), दि. 18 : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-202 घोषित करण्यात आले आहे. क्रीडा शिक्षकांना खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळाची शास्त्रोक्त माहिती शिक्षकांना  होणे आवश्यक आहे. क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यावत जिल्हास्तरीय प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात क्रीडा शिक्षकांसाठी निवासी स्वरुपाचे सात दिवसाचे क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. 1 जून ते 7 जून, 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि.हिंगोली येथे करण्यात आले आहे.   

या प्रशिक्षण शिबिराचा लाभ क्रीडा शिक्षकांना घेण्यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी आपल्या स्तरावरुन क्रीडा शिक्षकांना या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्यासाठी  कार्यमुक्त करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.   

*****

No comments: