भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची
मोफत संधी
इच्छूक उमेदवारांनी 10 जून रोजी मुलाखतीस हजर रहावे
हिंगोली (जिमाका), दि.26 : संघ लोकसेवा आयोग
(युपीएससी), नवी दिल्ली यांच्यामार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी दि.
3 सप्टेबर, 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण
दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी दि. 19 मे, 2023 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज
(रोजगार समाचार) मध्ये जाहिरात पसिध्द झाली होती. संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज
भरण्याची अंतिम मुदत दि. 6 जून, 2023 अशी होती. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर
करावा. कंम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (सीडीएस) या परीक्षेद्वारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे
कमीशन साठी निवड करण्यात येते.
कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी
करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे
महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 19 जून, 2023 ते दि. 1 सप्टेंबर, 2023 या
कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 61 चे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची
निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क (मोफत) सोय करण्यात आलेली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी
पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 10 जून,
2023 रोजी मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे
(डीएसडब्ल्यू) यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-61) कोर्ससाठी संबंधित या परिशिष्टांची
प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन जावेत.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,
नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष
किंवा दूरध्वनीवरुन संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली
यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment