हिंगोली
तालुक्यातील जोडतळा येथील बाल विवाह थांबविण्यास
जिल्हा बाल
संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनला यश
हिंगोली (जिमाका), दि.
04 :
जिल्ह्यात बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी
मा.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह
निर्मूलन समिती गठीत करण्यात आली आहे. मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार ग्राम बाल संरक्षण
समिती स्थापन करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील हिंगोली
तालुक्यातील जोडतळा येथे एका अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होणार असल्याबाबत चाईल्ड
लाईन (1098) ला गोपनीय माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर.मगर
यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या
नियोजनानुसार बासंबा पोलीस स्टेशन येथील सहा. पोलीस निरीक्षक व्ही.एस.चवळी, बिट
जमादार एस.जी.मोरे यांच्या सहकार्याने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा
परिविक्षा अधिकारी अॅड.अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी घटनास्थळी
भेट देऊन उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती
सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्षे असावे आणि जर मुलाचे
व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा
गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते.
तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल
विवाह थांबविण्यात आला. बालिकेच्या आई-वडीलांकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत
लग्न करणार नाही असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.
या वेळी जोडतळा येथील सरपंच निर्मला डोंगरदिवे, पोलीस पाटील गजानन जाधव आणि
बालिकेच्या कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या बालिकेला पुढील कार्यवाहीसाठी
मा.बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले. त्यानंतर बालिकेचे वयाची 18
वर्ष पूर्ण होईपर्यंत मा. बाल कल्याण समिती हिंगोली कडून दर महिन्याला बालिकेबाबत
पाठपुरावा करण्यासंदर्भात सूचना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात
येतात व त्यानुसार बालिकेची कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सामाजिक स्थिती/सद्यस्थिती
बाबत वेळोवेळी माहिती मा.बाल कल्याण समितीला कळविण्यात येते आणि बालीकेच्या
वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा घेतला जातो.
*****
No comments:
Post a Comment