उष्माघातात नागरिकांनी
स्वत:चा बचाव करावा
- पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 01 : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची
शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व
स्वत:चा बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री
अब्दुल सत्तार यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत केले आहे.
काय करावे :-
- उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी
रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील
माहितीचा वापर करण्यात यावा.
- तहान लागलेली नसली तरीसुध्दा
जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
- हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे वापरावेत.
बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत
घ्यावी.
- जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल
तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
- शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत
असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात
यावा.
- अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा
झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला
घेण्यात यावा.
- गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच
त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी
स्नान करण्यात यावे.
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध
टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
- पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त
कामाचा निपटारा करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची
काळजी घेण्यात यावी.
काय करु नये :-
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना
बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12.00 ते 3.00 या
कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
- बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक
श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर काम
करण्याचे टाळावे.
- उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक
करण्याचे टाळण्यात यावे. (तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या
उघडी ठेवण्यात यावीत.)
- शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास
कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इ.
यांचा वापर टाळावा.
- शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने
(Proteins) असलेले अन्न टाळावे.
*****
No comments:
Post a Comment