निकषाची पूर्तता
करुन जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करावेत
जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांचे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण आढावा बैठकीत निर्देश
- तंबाखू विरोधी स्वाक्षरी मोहिमेचा जिल्हाधिकारी
श्री. पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ
हिंगोली
(जिमाका), दि. 30 : शिक्षण विभागांनी निकषाची पूर्तता करुन जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त
करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
येथील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत
जिल्हास्तरीय समन्वय समितींची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अधयक्षतेखाली
पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य
विभागाचे डॉ. मयूर निंबाळकर, डॉ. श्वेता आचार्य, कुलदीप केळकर, आनंद साळवे, दिलीप धामणे,
धम्मदीप नरवाडे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजित संघई, सर्व शासकीय/निमशासकीय
कार्यालय प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी
जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी प्रत्येक कार्यालय प्रमुखांचा प्रत्यक्ष तंबाखू नियंत्रणबाबत
कार्यवाहीचा आढावा घेतला. यामध्ये आरोग्य व पोलीस विभागाने कार्यवाही केल्याचे
निदर्शनास आले आहे. इतर विभागानेही नियमितपणे कार्यवाही करावी. त्याचबरोबर नगर परिषद,
राज्य परिवहन, कृषी, बांधकाम, समाजकल्याण आदी विभागांनी आपल्या स्तरावर तंबाखू विरोधी
कायद्याचे उलंघन होत असल्यास 200 रुपयापर्यंत दंड आकरण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
नगर परिषद व पोलीस विभाग यांनी शाळांच्या आवारातील तंबाखूची विक्री हटविण्याबाबत कार्यवाही
करावी, त्याचबरोबर पोलीस विभागाने तंबाखूबाबत केलेल्या कार्यवाहीचा मासिक अहवाल जिल्हा
तंबाखू नियंत्रण कक्षास पाठवावा, अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात
घेण्यात आली तंबाखू विरोधी स्वाक्षरी मोहिम
आज दि. 30/05/2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या आढावा
बैठकीनंतर तंबाखू विरोधी स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी तंबाखू विरोधी फलकावर स्वाक्षरी करुन केले. त्यानंतर उपविभागीय
अधिकारी उमांकांत पारधी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, उप मुख्याधिकारी
हेंबाडे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, डॉ. मयूर निंबाळकर, डॉ. श्वेता आचार्य, अभिजित
संघाई, आनंद साळवे, कुलदीप केळकर, दिलीप धामणे, धम्मदिप नरवाडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
त्यानंतर उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांनी तंबाखू विरोधी फलकावर स्वाक्षऱ्या करुन
मोहिमेमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला.
******
No comments:
Post a Comment