हिंगोली येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे आपला दवाखान्याचे
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते
उद्घाटन
हिंगोली (जिमाका), दि. 01 : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पोळा मारोती मंगळवारा हिंगोली येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या
हस्ते उदघाटन संपन्न झाले.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले, हिंदूहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये गोरगरीब जनतेला मोफत औषध उपचार मिळणार आहे. हिंगोली
जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीकडून नवीन सहा रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात
आले आहेत. तसेच जिल्ह्यात नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब
ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्यवर्धिनी
केंद्रासाठी येत्या काही दिवसांमध्ये नवीन 9
रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येतील,
असे सांगितले. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांचे कौतुक
केले.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
हे सेनगाव येथील इंदिरानगर, कळमनुरी येथील इंदिरानगर, वसमत येथील सम्राट कॉलनी, औंढा
येथील जवाई नगर या पाच ठिकाणी आज मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन
लोकार्पण सोहळा संपन्न झाला,
यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजीराव मुटकुळे,आमदार संतोष बांगर,
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी
पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग
अधिकारी डॉ. गणपत मिरदुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, जिल्हा कार्यक्रम
व्यस्थापक शंकर तावडे, वैद्यकीय अधिकारी व स्टाफ इत्यादी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment