मराठा उद्योजक
घडविण्यासाठी
अण्णासाहेब पाटील
महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार
हिंगोली
(जिमाका), दि. 10 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या
योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्यासाठी बँक ऑफ
इंडिया व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या दरम्यान दि. 8 मे, 2023 रोजी बँक ऑफ
इंडियाच्या पुणे विभागीय कार्यालयात जनरल मॅनेजर राधाकांत यांच्या उपस्थितीत
सामंजस्य करार करण्यात आला. या दरम्यान बँक ऑफ इंडियाचे डेप्यूटी जनरल मॅनेजर
रविंद्र बोगा, लगणजीत दास, चीफ मॅनेजर समीर देशपांडे, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र
अण्णासाहेब पाटील हे उपस्थित होते.
राज्यातील सर्व बँक ऑफ
इंडियाच्या शाखांना पत्रकाद्वारे कराराची माहिती देण्यात येणार आहे. त्याच्या
माध्यमातून महामंडळाच्या लाभार्थ्यांना सीजीटीएमएसई (CGTMSE) व सीजीएफएमयू (CGFMU)
या दोन क्रिएट गॅरंटी देण्यात येणार आहेत. जे तरुण क्रेडिट गॅरंटीच्या माध्यमातून
कर्ज मागणी करतील त्यांना याचा लाभ देण्यात येईल. जास्तीत जास्त महामंडळाच्या
योजनांचा लाभ घेऊन राज्यात उद्योजक होतील यादृष्टीने शासन आणि महामंडळ प्रयत्नशील
आहे.
हा सामंजस्य करार पुणे,
कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, नागपूर संपूर्ण विदर्भ या भागासाठी करण्यात
आला आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक बँक ऑफ इंडिया पुढील कालावधीत प्रसिध्द करणार असून
त्यानंतर या कराराची अंमलबजावणी सुरु होईल.
या झालेल्या सामंजस्य
कराराप्रमाणेच या अगोदर देखील मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, कोकण विभागासाठी
या प्रकारचा करार करण्यात आला आहे. यापूर्वीच्या या कराराचा लाभ या विभागातील
लाभार्थ्यांना झालेला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात एक
लाख मराठा उद्योजक होण्याच्या दृष्टीने या करारामुळे लाभ होणार असल्याची माहिती
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद पाटील यांनी दिली आहे, असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे
*****
No comments:
Post a Comment