04 May, 2023

 

जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाअंतर्गत

निरीक्षणगृह व बालगृहामध्ये तीन दिवसीय क्रीडा महोत्सव साजरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 :  महिला व बाल विकास विभागाद्वारे शासकीय बालगृहात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत दि. 26 ते 28 एप्रिल दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध खेळामध्ये बालकांनी सहभाग नोंदवून महोत्सव उत्साहात साजरा केला.

बालगृहांमधील अनाथ, निराधार, निराश्रीत मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण व्हावी यासाठी दि. 26 ते 28 एप्रिल दरम्यान सरस्वती मुलीचे निरीक्षणगृह, सावरकर नगर, हिंगोली व श्री स्वामी समर्थ बालगृह खानापुर (चित्ता) येथे तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 100 मिटर धावणे, लांब उडी, कबड्डी, दोरीवरच्या उड्या, कॅरम, नृत्य, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, योगा इत्यादी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेत बालगृहातील सर्व प्रवेशितांनी वैयक्तिक व सांघिक खेळ नृत्य, तसेच विविध सहभाग घेऊन क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घेतला. बालकांसोबत मोठ्यांनी सुद्धा बालस्नेही होऊन बालकांसोबत खेळाचा आनंद घेतला.

या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मा.आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्या पत्रानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर.मगर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, सदस्य परसराम हेंबाडे, सदस्या संगिता दुबे, किरण करडेकर आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड.अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, माहिती विश्लेषक  शेख रफीक शेख जिलानी, क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, डाटा एन्ट्री ऑपरेटर राहुल सिरसाट, लेखापाल शितल भंडारे इ. उपस्थित होते. बालसरस्वती मुलीचे निरीक्षणगृहाच्या अधिक्षीका रेखा भुरके, शिक्षक शंकर घ्यार व श्री स्वामी समर्थ बालगृहाचे अधिक्षक रमेश पवार, बालगृहातील सर्व कर्मचारी यांनी योगदान दिले.

*****

No comments: