जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिन विविध कार्यक्रमांनी
साजरा
हिंगोली
(जिमाका), दि. 31 : जागतिक
तंबाखू नकार दिनाच्या निमित्ताने आज दि. 31
मे, 2023 रोजी जिल्हा रुग्णालयातर्फे तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धा
घेण्यात आली व विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी
यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली,
त्यानंतर तंबाखू विरोधी साप-सिडी खेळाच्या
माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली.
तसेच जिल्हा रुग्णालयातून तंबाखू विरोधी घोषणा देत रॅली काढण्यात आली. तसेच दिलीप धामणे
व कुलदीप केळकर यांनी उपस्थितांना मारगदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांना तंबाखू विरोधी
शपथ देण्यात आली. अशा विविध कार्यक्रमानी जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र
सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. भगवान पुंडगे, डॉ. दिपक मोरे, डॉ. चव्हाण, डॉ. खान, डॉ.मयूर
निंबाळकर, ज्ञानेश्वर चौधरी, असि. मेट्रन क्षीरसागर,
साळुंखे, कुलदीप केळकर, आनंद साळवे, घोषणा कोराम, दिलीप धामणे, अरबाज खान तसेच शासकीय
नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ) व आनंद साळवे (सोशल
वर्कर) यांनी परिश्रम घेतले.
*****
No comments:
Post a Comment