चर्मकार समाज बांधवांनी अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी
प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 01 : संत रोहिदास चर्मोद्योग
व चर्मकार विकास महामंडळाच्या हिंगोली जिल्हा कार्यालयासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी
अनुदान योजनेचे 20 व बीज भांडवल योजनेचे 16 असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या दोन्ही
योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चर्मकार समाजाच्या चांभार, मोची, ढोर
व होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत
आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही
योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या
कागदपत्रांची पूर्तता करुन महामंडळाच्या विहित नमुन्यात कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत संत
रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली या ठिकाणी दि. 01 जून, 2023 पासून कार्यालयीन
वेळेत स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थामार्फत
कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.
अर्जदारांनी
कर्ज प्रस्तावासोबत जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याकडून घेतलेला असावा), अर्जदाराच्या
कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (चालू वर्षाचा तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा), नुकत्याच
काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या तीन प्रती, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशन कार्ड
झेरॉक्स प्रत, मतदान ओळखपत्र/आधारकार्ड/पॅनकार्ड झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक
(कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रक किंवा
मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8), लाईट बिल, टॅक्स पावती, बीज भांडवल योजनेसाठी
प्रकल्प अहवाल , वाहनासाठी लायसन्स, परवाने बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत/नगर परिषद
यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला,
अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र
देण्यात यावे.
हिंगोली जिल्ह्यातील
प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील बेरोजगार युवक व युवतींना
तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अरुण राऊत, जिल्हा
व्यवस्थापक, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment