शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत जागेवरच निवड संधी मोहिमेतून
22 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची निवड
हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल
करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली येथे शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आज दि. 7 जून,
2023 रोजी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जागेवरच निवड संधी
मोहिमेअंतर्गत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या रोजगार मेळाव्यात क्रेडिट
ऍक्सेस ग्रामीण लि.नागपूर, नवकिसान बायोप्लॅन्टेक लिमिटेड, नांदेड व एसबीआय लाईफ
इंन्स्यूरंस, हिंगोली या आस्थापना/कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. जागेवरच निवड
संधी या विशेष मोहिमेअंतर्गत रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय,
डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 38 उमेदवार उपस्थित होते. या 38
उमेदवारांपैकी 22 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी मेळाव्यास
उपस्थित उमेदवारांना आता केलेल्या क्यूआर कोडवर एकदा नोंदणी केल्यावर आपणास रोजगार
उपलब्ध होईपर्यंत वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याची माहिती मिळणार आहे.
तसेच सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी व
करिअर कसे निवडावे याबाबत माहिती देण्यासाठी नॅशनल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली येथे करण्यात आली
आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी म. शां. लोखंडे, न. द. टोनपे, रा. द. कदम, म. ना. राऊत, अ. अ. घावडे,
ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment