वसमत येथील मातेची रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी
प्रवासादरम्यान प्रसूती
- आरोग्य उपसंचालक यांचा खुलासा
हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्ह्यातील वसमत येथील महिलेची प्रसूती स्त्री रुग्णालयात दि. 5
जून, 2023 रोजी ॲटोमध्ये झाल्याच्या अनुषंगाने एबीपी न्यूज चॅनलवर प्रसारित
झालेल्या बातमीच्या अनुषंगाने औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शल्य
चिकित्सक, हिंगोली यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश
दिले होते. या आदेशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी त्रिसदस्यीय समिती
गठीत करुन बातमीच्या अनुषंगाने चौकशी केली. या चौकशी समितीने रुग्णालयातील सीसी
टीव्ही फुटेज व घटनेच्या वेळी रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी
यांचे जबाब घेऊन चौकशी अहवाल सादर केला आहे.
या चौकशी अहवालाप्रमाणे
दि. 5 जून, 2023 रोजी दुपारी 3.53 वाजता एक ॲटोरिक्षा स्त्री रुग्णालय वसमत येथे
गेटवर येऊन थांबला. त्यानंतर दोन मिनिटाच्या आत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी
रुग्णाला स्ट्रेचरवर व नवजात बाळाला बेबी ट्रे मध्ये घेऊन रुग्णालयात आणले. त्यानंतर
रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ, अधिपरिचारिका यांनी बाळास व मातेस तातडीने
रुग्णालयात दाखल करुन घेऊन योग्य ते उपचार दिले. सद्यस्थितीत बाळाची व मातेची
तब्येत स्थिर असल्याचे दिसून येते. सदरील मातेची प्रसूती रुग्णालयात दाखल
होण्यापूर्वी प्रवासा दरम्यान झाली असल्याचे समजून येत असल्याचा खुलासा उपसंचालक
आरोग्य सेवा, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
****
No comments:
Post a Comment