पंढरपूरला
जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना
पथकरातून
सवलत प्राप्त करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 16 : आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या
ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य
रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर
स्थानकावर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनाना दि. 13 जून,
2023 ते दि. 3 जुलै, 2023 या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांना हलक्या
व जड वाहनासाठी पथकरातून सूट देण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत.
त्या
अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना पथकरातून सवलत प्राप्त
करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला
आहे. या कक्षामार्फत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व नागरिकासाठी पथकरातून सवलतीसाठी
लागणारी पास कार्यालयात दि. 13 जून, 2023 ते दि. 3 जुलै, 2023 पर्यंत सकाळी 9.00 ते
रात्री 10 पर्यंत तसेच शनिवार व रविवार या शासकीय सुटीच्या दिवशी देखील हिंगोली जिल्ह्यातील
नागरिक प्राप्त करु शकतात.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी
पासेस प्राप्त करण्यासाठी निलेश पवार, सहायक मोटार वाहन निरीक्षक (मो. 7499605316)
व स्वप्नील ससाणे, सहायक मोटार वाहन निरीक्षक (मो.9890228868) यांच्याशी संपर्क साधावा,
असे आवाहन अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment