कृषी विज्ञान
केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्यात सामंजस्य करार
हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्ह्यात हळद हे मुख्य पीक असून "एक जिल्हा एक
उत्पादन" या योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये मुख्य
उत्पादन हळद या पिकाचे आहे.
हळद पिकाच्या
माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हळद पिकामध्ये लागवडीपासून
ते प्रक्रियेपर्यंत विविध तंत्रज्ञानाचा प्रसार कृषी विज्ञान केंद्राद्वारे
करण्यात येत आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शेतकऱ्यांची हळद निर्यात होण्याच्या
दृष्टिकोनातून अनेक योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही संस्थांचा आज कृषी
विज्ञान केंद्रात सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी व जिल्हा
उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब कादरी यांनी स्वाक्षरी करुन हा सामंजस्य करार
केला.
यावेळी कृषी
विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. राजेश भालेराव (कृषी विद्या), प्रा. सौ.
रोहिणी शिंदे (गृहविज्ञान), प्रा. साईनाथ खरात (मृदाविज्ञान) डॉ. अतुल मुराई (कृषी
विस्तार), डॉ. कैलास गीते कार्यक्रम सहाय्यक (पशुविज्ञान) आणि उद्योग
निरीक्षक वर्षा लांडगे, उद्योग निरीक्षक सुदेशना सवराते व महेश कायंदे उपस्थित
होते.
******
No comments:
Post a Comment