महाज्योतीच्या एम.पी.एस.सी.
अर्थसहाय योजनेतील 131 विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची संधी
हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र
शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा
फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग,
विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व
चाचणी परीक्षेकरिता एकरकमी अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते.
महाज्योतीने
सन 2022-23 या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग,
विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी.
व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता एकरकमी अर्थसहाय्य करण्याची योजना सुरु केली होती.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 20/10/2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, त्याकरिता
एकूण 439 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी योजनेकरिता पात्र 437 विद्यार्थ्यांना
एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता अर्थसहाय्य करण्यात
आले होते.
एम.पी.एस.सी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेचा निकाल दि.28 फेब्रुवारी, 2023 रोजी जाहीर
करणात आला होता. त्यात महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या 131 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र
प्रशासनात विविध विभागात प्रशासकीय काम करण्याची संधी मिळाल्याची माहिती हाती आली.
त्यातील 68 विद्यार्थी हे इतर मागास वर्ग,
11 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती– ब वर्गातील 11 विद्यार्थी, भटक्या
जमाती– क मधील 18 तर भटक्या जमाती– ड मधील 20 विद्यार्थ्यांचा तसेच विशेष मागास प्रवर्गातील
3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या प्रसंगी
ना.श्री.अतुल सावे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर
यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात
येणाऱ्या एम.पी.एस.सी. व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता एकरकमी अर्थसहाय्य करणाऱ्या
योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. राजेश खवले, व्यवस्थापकीय
संचालक महाज्योती, नागपूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत
विश्वजीत जालंदर गाताडे
माझं बारावी
पर्यंतचे शिक्षण खेडेगावातून झाले. पुढे पदवीसाठी कोल्हापुरात शिकायला आलो. वडील आरोग्यसेवक
आहेत. त्यांनी माझ्या एमपीएससी होण्याच्या स्वप्नाला बळ दिलं. सप्टेंबर 19 पासून मी
एमपीएससीचा अभ्यास करतोय. मग अभ्यासाला योग्य मार्गदर्शन हवे असे वाटायला लागले. मित्रांकडून
महाज्योतीच्या एम.पी.एस.सी. परीक्षा प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. आणि प्रवेश मिळवला.
प्रशिक्षणात शिकवलेल्या सिलॅबसचा खुप फायदा झाली. आज महाज्योतीमुळे माझे प्रशासकीय
अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण होत आहे.
अस्मिता मधुकर घाडगे
मला एमपीएससी
बनण्याची प्रेरणा माझ्या वडीलांकडून मिळाली. माझं पुणे विद्यापीठातून एमएसस्सी, सेट
आणि नेट झालेले आहे. पण तरी स्वत:च्या पायावर उभी नसल्याने आर्थीक ताण होता. महाज्योतीच्या
एम.पी.एस.सी. परीक्षा प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला. विद्यावेतनाची खुप आर्थिक मदत झाली.
पुणे, दिल्ली शहरात राहता आले. खाण्याची सोय करता आली. टेस्ट सिरीज, मुलाखतीवर खर्च
करता आला. महाज्योतीच्या योजना बहुजन विद्यार्थ्यांसाठी उपकारक ठरत आहे. पोस्ट मिळाल्यावर
सर्व मेहनतीचे सार्थक झाल्याचे वाटते.
*****
No comments:
Post a Comment